नीळ पाणी नितळ पाणी
अशी बरीच वर्णनं कवितातून ऐकली
नितळ पाण्याच्या तळापर्यंत जाऊन पाहायचा प्रयत्न केला
तेव्हा लक्षात आलं कि निळा रंग पाण्याचा नाही
त्यात पाडणाऱ्या आकाशच्या प्रतिबिंबाचा असतो
पाणी झाकून ठेवलं तर ते काळपट दिसेल
हेहि लक्षात घरात झाकून ठेवलेल्या पाण्याला पाहून कळलं
माणसाच्या शरीरात ७५ टक्के पाणी आहे असं म्हणतात
म्हणूनच असेल बहुतेक ज्यांच्या संगतीत आपण येतो
तसाच आपला स्वभाव बनत जातो