मी नास्तिक आहे हे सांगायला मला अत्यानंद होत नाही
तसाच मी अस्तिक नाहि ह्याचा विषाद वाटत नाही
कारणंही तशीच दमदार आहेत मी नास्तिक असण्याची
आणि ती खोडून काढण्याची कोणाची बिशाद नाही
सोयीस्कररित्या देवाला वेठीला धरतात लोक
काही हव असेल तर त्याला लाच देऊ करतात
अहो देव म्हणजे काय सरकारी कर्मचारी वाटला?
नारळ किंवा कोंबडे घेऊन तुमची काम करायला?
तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याची काम आणि नाव बदलून टाकलीत
मला कळत नाही देव तो आहे कि तुम्ही?
काहीजण त्याला देवळात शोधतात तर काही देव्हाऱ्यात
देव गोरगरिबांच्या हृदयात दडलाय हा समज देखील खोटा आहे
त्याच गरीबांनी आज देव पैशासाठी ताटलीत आणला आहे
तुम्हाला देवदर्शन घडवणं हे जणू त्यांच कर्त्यवच आहे!
हि सेवा आहे कि छळवणूक कारण तो देव पाहून
देव मानणारे आणि न मानणारे सगळेच नाक मुरडतात
देवाला दोन मुलं आहेत असा माझ्या ऐकिवात आहे
देवाच्या मोठ्या पुत्राला त्यांचे भक्त गृहीत धरतात
काय तर म्हणे तो त्यांच्या यातना सहन करतो
त्याच्यासमोर सगळे गुन्हे क्न्फेस करा
तो शिक्षा केलेल्या अवस्थेत गेली दोन हजार वर्ष आहे
त्यांना वाट्टेल तस वागताना त्याची दया येत नाही?
आपली शिक्षा देवावर ढकलणारे हे कोण? भक्त?
आणि आणखी एक देवाचा धाकटा पुत्र आहे
तो त्याच्या मोठ्या भावापेक्षा अगदीच निराळा आहे
तो म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवत नाही
त्याला त्याच्या भक्तांनी मारून टाकाव
भक्त म्हणतात असा फतवा आहे त्याचा
अशी दोन टोकाची वृत्ती असलेले पुत्र देवाने जन्माला घातले?
का त्याच्या भक्तानीच त्या दोघांना जन्माला घातला?
काहींनी निरपेक्ष वागा अस सांगणाऱ्या देवाला आपलस केलंय
पन्नास साठ वर्ष झाली असतील ह्या गोष्टीला
पण निरपेक्ष देवाच्या ह्या भक्तांच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत
ते त्याला हक्कासाठींचा लढा म्हणतात
हक्क कर्तृत्वाने मिळाववेत भिक मागून, ओरबाडून नाही
सगळ्यात गमतीचा प्रश्न हे सगळे देव का आहेत?
मोक्ष ,मुक्ती, सालवेशन यासाठी अस भक्त म्हणतात
मग कोणता देव श्रेष्ठ? ह्या भांडणात
एकमेकांना मुक्ती द्या अस कोण सांगतय?
ह्याच उत्तर देव किंवा त्याचे मुलगे, कोणीच देऊ शकत नाही
~~~~~~~~~अक्षय दांडेकर

No comments:
Post a Comment