Tuesday, 20 December 2011

पाणी आणि जीवन

नीळ पाणी नितळ पाणी 
अशी बरीच वर्णनं कवितातून ऐकली 
नितळ पाण्याच्या तळापर्यंत जाऊन  पाहायचा प्रयत्न केला 
तेव्हा लक्षात आलं कि निळा रंग पाण्याचा नाही 
त्यात पाडणाऱ्या आकाशच्या प्रतिबिंबाचा असतो 
पाणी झाकून ठेवलं तर ते काळपट दिसेल 
हेहि लक्षात घरात झाकून ठेवलेल्या पाण्याला पाहून कळलं
माणसाच्या शरीरात ७५ टक्के पाणी आहे असं म्हणतात 
म्हणूनच असेल बहुतेक ज्यांच्या संगतीत आपण येतो 
तसाच आपला स्वभाव बनत जातो    

झोप

काल नेहमीप्रमाणे  रात्री एक स्वप्न पाहिलं
त्यात चक्क दिसलं कि मी चांगलं स्वप्न पाहतोय
आजकाल चांगली स्वप्नसुद्धा स्वप्नवत आहेत
पण नशीब इतकं कि आम्हाला स्वप्न पडतात 
कमीत कमी तितकी झोप आम्हाला येते 
असं म्हणतात कि काहीना झोपच येत नाही 
त्यांनी स्वप्न पाहणं हि दूरची बात आहे
त्याला ते निद्रानाश अशा रोगाचं नाव देतात
पण खरी गोष्ट अशी आहे कि 
इतरांची झोप  उडवण्याच्या नादात 
ते स्वतःची झोप हरवून बसलेले असतात
आणि तीच हरवलेली शांत झोप मिळावी 
म्हणून हे निशाचर व्हेकेशनला जातात 
 

Friday, 9 December 2011

जागो भारत जागो

महान मेरा भारत
यहा जो करते झोल
कहलाते अनमोल
जनता के वो रक्षक
पैसे के वो भक्षक
असल में है वो
राक्षसो के बादशाह
इनका किसी से ना वास्ता
झुटी इनकि दास्तान
हो 2G, 3G Scams
या हो चारा या लवासा
देते जनता को ये झांसा
जनता मजबूर
सुखो से दुर, दुखो में चूर
जिये सडीसी जिंदगी
जैसे हो इनके मजदूर
महंगाई बेहीसब
फिरभी मजेमें कसाब
खाये फोकट कि बिर्यानी
पिये बिसलरी का पानी
पर मरे किसान
ना मिले बीज ना खाद
उनके पेट में आग
बुझाये कौन?
जो खाये थप्पड नेता
तो उसके चुतीये कार्यकर्ता
करे फालतू के निदर्शन
परेशान जनता 
और गोसीप में नेता
कैसे जाने कोई है गावमें अवर्षण
इनको है बस सत्ता का आकर्षण
करे जो आंदोलन 
और दे सच्चाई का साथ
ये लगाते उसकी वाट
और बनाते उसकी जिंदगी झाट
ना है इनकि कोई जात
नहि है इनका कोई मजहब
बस है पैसा इनका मकसद
इनका ना कोई बाप ना कोई भाई
इनकी बहन ना कोई माई
इनका बस चले तो ये बेच दे
सगी मा को भी ये कुत्ते
कोबरा लिखे सच्चे किस्से
तू मान या ना मान
चोईस भी है तेरा  वोईस भी है तेरा
अबे उठ जा क्यू है नींद में?
है भविष्य मुश्कील में!

Thursday, 8 December 2011

मोकळं आहे रान

मोकळं आहे रान
ज्याला शक्य आहे त्याने वाघ व्हावे
ज्याला शक्य नाही त्याने ससा व्हावे
पण मुळातच ससा म्हणून जन्मलेल्याने
वाघाच्या वाटेला का जावे ?
आणि नंतर आभाळ कोसळलं
म्हणत सैरावैरा का पळावे?
काय म्हणता? तो वाघ नाही
मान्य आहे नसेल तो खरा वाघ
पण आपल्यातलाच असलेला तो एक
वाघाचं कातडं पांघरलेला एक सैतान आहे
जमीन आपली आहे, आकाश आपलं आहे
झाडं आपली आहेत, सगळं आपलचं आहे
पण हे सगळं आपलं आहे
हे विसरून सगळं त्याच्या हवाली करणारे प्राणी
जोपर्यंत एकत्र होत नाहीत
तोपर्यंत त्याला रान मोकळच आहे

~~~~~~~~~अक्षय दांडेकर 

वेळ खूप थोडा आहे!

खूप काही करायचंय आयुष्यात
अजुन ५० टक्के सुद्धा झाल नाहीये
आई बाबा म्हणतात
मी पंचविशीचा घोडा आहे
वेळ खूप थोडा आहे!

काही करा कामात क्वालिटी तर हवीच
क्वांटीटी कमी असण्याचा प्रश्नच येत नाही
प्रत्येकाच्या डोक्यावर डेडलाईनची टांगती तलवार आहे
मी नाही परफॉर्म केला तर दुसरा कोणीतरी करणार आहे
खरच वेळ खूप थोडा आहे

घड्याळाचे काटे फिरत असतात
तास काटा  मिनिट काटा आणि सेकंद काटा
लक्ष तास काट्यावर नाही सेकंद काट्यावर ठेवा
वेळ खूप थोडा आहे

जे काहि करायचं आयुष्यात ते आताच करून घ्या
पुढच्या वर्षी जगबुडी होणार
असा बऱ्याच शास्त्रज्ञांचा होरा आहे
वेळ खुपच थोडा आहे 

....................अक्षय दांडेकर

अस का ??

आत्तापर्यंतच एक खूप मोठ कोडं आहे
माहित असत तो मिक्सर नाही मिळणार आपल्याला
तरीही हजारो लोकं मिक्सर मिळेल
ह्या वेड्या आशेनी पेपरातल शब्दकोडं सोडवत असतात
आणि गम्मत म्हणजे ज्यांना मिक्सरची गरज नसते
त्यांनाच तो मिक्सर मिळतो
आणि इतर सगळे जण अस का झाल?
हे दुसर कोडं सोडवत बसतात

आत्तापर्यंतची एक खूप कठीण परीक्षा आहे
माहित असत पहिला नंबर नाही येणार आपला
तरीही सगळे जण पहिला नंबर येईल
ह्या आशेनी मन लावून तासंतास अभ्यास करतात
पहिला नंबर यायचा त्याचाच येतो
आणि इतर मुलं अस कस झाल?
हि दुसरी परीक्षा देत राहतात

आजपर्यतच एक खूप मोठ struggle आहे
माहीत असत विंडो सीट मिळणार नाही आपल्याला
तरीही मिळेल ह्या आशेनी ढकलाढकली करत
मारामारी करत इतरांना दुखवत गाडीत लोक प्रवास करतात
सीट ज्याला मिळायची त्यालाच मिळते
आणि इतर लोक मेरा नंबर कब आयेगा?
ह्या विचारात इच्छित स्थळी पोचतात

पण काही वेळेस काही गोष्टी आपोआप घडतात
काही लोक आयुष्यात येतात
आपल्याला आपलस करून घेतात
आपणही तेच करायला गेलो तर लक्षात येत
आपण त्या व्यक्तीचे आहोत पण ती व्यक्ती आपली नसते
आणि आपण अस का झाल ह्या विचारात
सुंदर आठवणीत आयुष्य व्यतीत करतो

~~~~~~~~~~~अक्षय दांडेकर

चित्र

लहान होतो तेव्हा चित्र फार आवडायची
पण आता मात्र चित्र पहिली कि भीती वाटते
काहींनी चित्रांच patent घेतल
आणि ती चित्र एकसारखी दाखवून नकोशी करून टाकली
जंगलचा राजा वाघोबा जवळचा वाटायचा
आता मात्र वाटत कि तोच आपले लचके तोडेल
त्याला रंगज्ञान आहे कि नाही ठाऊक नाही
त्याला काहींनी पार रंगीत करून टाकलाय
निळा काय आणि भगवा काय!

धनुष्यबाण पहिला कि प्रभू राम आठवायचे
गुरुवर असलेली एकलव्याची श्रद्धा निष्ठा आठवायची
त्यावेळी राजकारण केलं होता ते अर्जुनासाठी
महाभारतात त्या योद्ध्याची गरज होती
आज मात्र अनेक एकलव्य आहेत
आणि धनुष्यबाणाच राजकारण चालूच आहे
बोट नाही कापून घेत ते त्यांचं
पण तोच बाण धनुष्यातनं सुटून
कधी त्यांच्याच छाताडात घुसेल ह्याचा नेम नाही

कमळ पहिल कि देवी लक्ष्मि डोळ्यासमोर येत असे
ज्ञान आणि धन ह्यांचा वर्षाव करणारी सुंदर मूर्ती
आता मात्र कमळ पहिल कि वाटत तो एक सापळा आहे
भुंग्याला जस कमळ आपल्या कळीत अडकवून ठेवत ना अगदी तसा
आजकाल भून्ग्यांची संख्या बरीच आहे कमळ एकच आहे
तरीही सगळे भुंगे त्यात नक्कीच अडकतील
इतके भुंगे भोळे आणि तितकच जास्त कमळ धूर्त आहे

इंजिन पाहिलं ना कि मामाच गाव आठवायच
पळती झाडं आठवायची आणि सुगरण मामी सुद्धा
आता मात्र तस नाही आता समोर ते चित्र आलं
कि वास्तव समोर येत कि ते इंजिन आहे एक तोंड
एका आगगाडी इतक्या लांब असलेल्या अजगराच
आणि तो अजगर नुसता शक्तिशाली नाही तर दुतोंडी आहे
खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असलेला

घड्याळाच चित्र आधी फारच जवळच वाटायचं
कारण ते दिसत अगदी आजी जवळ असलेल्या गजराच्या घड्याळासारख
आपल्याला वाटत गजर लावून आपण बरोबर पाच वाजता उठू
पण ते घड्याळ पाच वर्षांचा गजर लावून ठेवलय
त्या पाच वर्षात तुम्ही झोपून राहाल
आणि घड्याळाच  patent घेतलेले लोक
तुम्ही झोपलायात ह्याचा मनसोक्त आनंद उपभोगतील

हात पहिला  कि आजकाल जरा जास्तच भीती वाटते
लहानपणी आईचा हात धरावा आणि तरुणपणी प्रेयसीचा
आता हाताच चित्र पहिल कि अर्थ उमजतो
हात दाखवणे ह्या मराठी वाक्प्रचाराचा
हात मैत्रीचा, हात प्रीतीचा, हात मदतीचा
इत्यादी वाक्प्रचार सपशेल खोटे आहेत
हे पक्क पटवून दिलं मला ह्या चित्राने

इम्पोर्टेड भारत

भारतीय लोकांमध्ये एक  फॅड आहे नेहमीचं
भारतीय सगळं downmarket म्हणायचं
इतिहासाची पुस्तकं पास होण्यापुरतीच वाचतात ते
मुघल, पोर्तुगीज, इंग्रज परके लोक सगळे
ह्यांच्या अश्या वृत्तीमुळेच उरावर येऊन बसले
पोह्यांची जागा पास्त्यानी घेतली
चिक्कीहून चॉकलेट जास्त गोड झाल
पन्ह्याऐवजी पेप्सी प्यावसं वाटत
पोळी भाजी ऐवजी पिझ्झाहि चालतो
हमारा बजाजचे दिवस गेले होंडाचे दिवस आले
आपली भाषासुद्धा केवढी इंग्रजाळल्ये
लिहिताना किंवा बोलताना इंग्रजी आडवी येतेच
अस म्हणतात कि ह्यामुळे जग जवळ येतय
जागतिकीकरण आहे कि आणखी काही?
इम्पोर्टेड ह्या शब्दाने भारावून गेलेल्या
आपल्या ह्या स्वतंत्र भारत देशात
आपले राज्यकर्ते सुद्धा इम्पोर्टेड आहेत! 

~~~~~~~~~अक्षय दांडेकर

देव

मी नास्तिक आहे हे सांगायला मला अत्यानंद होत नाही
तसाच मी अस्तिक नाहि ह्याचा विषाद  वाटत नाही
कारणंही तशीच दमदार  आहेत मी नास्तिक असण्याची
आणि ती खोडून काढण्याची कोणाची बिशाद नाही
सोयीस्कररित्या देवाला वेठीला धरतात लोक
काही हव असेल तर त्याला लाच देऊ करतात 
अहो देव म्हणजे काय सरकारी कर्मचारी वाटला?
नारळ किंवा कोंबडे घेऊन तुमची काम करायला?
तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याची काम आणि नाव बदलून टाकलीत
मला कळत नाही देव तो आहे कि तुम्ही?
काहीजण त्याला देवळात शोधतात तर काही देव्हाऱ्यात
देव गोरगरिबांच्या हृदयात दडलाय हा समज देखील खोटा आहे
त्याच गरीबांनी आज देव पैशासाठी ताटलीत आणला आहे
तुम्हाला देवदर्शन घडवणं हे जणू त्यांच कर्त्यवच आहे!
हि सेवा आहे कि छळवणूक कारण तो देव पाहून
देव मानणारे आणि न मानणारे सगळेच नाक मुरडतात
देवाला दोन मुलं आहेत असा माझ्या ऐकिवात आहे
देवाच्या मोठ्या  पुत्राला त्यांचे भक्त  गृहीत धरतात
काय तर म्हणे तो त्यांच्या यातना सहन करतो
त्याच्यासमोर सगळे गुन्हे क्न्फेस करा
तो शिक्षा केलेल्या अवस्थेत  गेली दोन हजार वर्ष आहे
त्यांना वाट्टेल तस वागताना त्याची दया येत नाही?
आपली शिक्षा देवावर  ढकलणारे हे कोण? भक्त?
आणि आणखी एक देवाचा धाकटा पुत्र आहे
तो त्याच्या मोठ्या  भावापेक्षा अगदीच निराळा  आहे
तो म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवत  नाही
त्याला त्याच्या भक्तांनी मारून टाकाव
भक्त म्हणतात असा फतवा आहे त्याचा
अशी दोन टोकाची वृत्ती असलेले पुत्र देवाने जन्माला घातले?
का त्याच्या भक्तानीच त्या दोघांना जन्माला घातला?
काहींनी निरपेक्ष वागा अस सांगणाऱ्या देवाला आपलस केलंय
पन्नास साठ वर्ष झाली असतील ह्या गोष्टीला
पण निरपेक्ष देवाच्या ह्या भक्तांच्या  अपेक्षा कधीच संपत नाहीत
ते त्याला हक्कासाठींचा लढा म्हणतात
हक्क कर्तृत्वाने मिळाववेत भिक मागून, ओरबाडून नाही
सगळ्यात गमतीचा प्रश्न हे सगळे देव का आहेत?
मोक्ष ,मुक्ती, सालवेशन यासाठी अस भक्त म्हणतात
मग कोणता देव श्रेष्ठ? ह्या भांडणात
एकमेकांना मुक्ती द्या अस कोण सांगतय?
ह्याच उत्तर देव किंवा त्याचे मुलगे, कोणीच देऊ शकत नाही

~~~~~~~~~अक्षय दांडेकर

अनुत्तरीत

कुंपणच खाई शेत
बुजगावण्याचा काय उपयोग?
पोलिसच करी चोरी
शंभर फिरवून काय उपयोग?
अग्निशामाकच लावि आग
एकशे एक फिरवून काय उपयोग?
वाळवी लागलेल्या लाकडाला
‍रंधा मारून काय उपयोग?
भगदाडं पडलेल्या साडीला
ठिगळं लावून काय उपयोग?
अनुवांशिक असलेल्या रोगाला
औषधाचा काय उपयोग ?
मुळातच व्हाय्यात व्यक्तीला
संस्कार वर्गाचा काय उपयोग?
अंध असलेल्या न्यायदेवतेपुढे
डोळस न्यायाधीशाचा काय उपयोग?
असंख्य अनुत्तरीत प्रश्न
विचार करून काय उपयोग?


~~~~~~~~~अक्षय दांडेकर