Monday, 13 February 2012

प्रेमळ मी!!

माझ्या प्रेम कविता वाचून 
बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल
हा कविता लिहितो तरी कोणासाठी?
बऱ्याच जणांना असही वाटत असेल
की अक्षय दांडेकर स्त्री लंपट आहे
असा किती जणींच्या प्रेमात आहे?
आणि त्याचं उत्तर आहे... होय!! 
मी प्रेमात आहे... बऱ्याच जणींच्या...
त्यातली एक... माझी प्रतिभा 
आणि वेगवेगळ्या नावांच्या माझ्या कविता

Sunday, 12 February 2012

मनातलं

आजपर्यंत तुझ्यावर 
कविता बर् याच झाल्या 
तुझी खुशामत म्हणुन होत्या त्या 
ठरवुन लिहीलेल्या 
मी फक्त मनातलं लिहीतो! 

ओळख!


तु जवळची का वाटतेस?
हे सांगता येणार नाही
तु तर मला आता आता
ओळखु लागलीस
पण मला तु अनोळखी
कधीच वाटली नाहीस

विदुषक

हसत रहा अशीच 
तितकाच एक आनंद जगात उरलाय 
नायक करु न शकला 
पण हे विदुषक करु शकलाय

का कुणास ठाऊक

तु भेटलीस मला 
आणि वाटल क्षणभर 
वाळवंटात पाऊस आला 
पण का कुणास ठाऊक 
गुलाब कोमेजुन गेला 
निवडुंग मात्र फोफावला

धोकादायक इमारत!


मी एक जुनी इमारत
१९४७ साली
माझी पायाभरणी झाली
त्या काळी बांधकाम उत्तम असे
माझं मात्र तद्दन तकलादु
आजकालच्या reconstruced इमारतींसारखं
माझंही rehabilitation केलेलं
माझ्यात राहिलेल्या गरीब भाडेकरुंच!
होय भाडेकरुच!
त्याना माझ्याविषयी ownership
कधी वाटलीच नाही,का वाटेल म्हणा!
मी त्यांची असुनही
माझ्यात राहण्यासाठी
त्यांच्या so called landlords ना
ते जबर किंमत मोजतात
rather त्यांच्याकडून landlords ती उकळतात
चाळ संस्कृती आहे असं वरवर दिसतं
कारण ते corridor share करतात
तरीही आपल्या दारासमोरच्या जागेवर हक्क सांगतात
आणि त्यावरुन भांडतात देखील
भांडणंसुध्दा multi linguial असतात
कधीकधी तर भाषा हा सुध्दा भांडणाचा विषय असतो
इतर फुटकळ विषय landlords गंभीर बनवतात
नव्हे they have expertise in that
धोकादायक इमारत ही पाटी
केव्हाच लागल्ये माझ्यावर
landlords want to rip me off
till I collapse
भाडेकरुंच काय आज आहेत उद्या
नसतीलही
they stay coz they have no way out 
at this moment!

प्रेमाचे मोती


प्रेम म्हणजे काय असतं?
पहाटेच्या दवबिंदुसारख 
नकळतपणे,गुपचूप
हळूच आपल्या आयुष्यात येत 
मनाच्या पानाचा स्पर्श होताच
सुंदर असा मोती बनत 
काही पानं मोती धरून ठेवतात
त्यांना त्यांची किंमत कळते 
काही पानं अळूच्या पानासारखी 
मोती ओघळून टाकतात 
आणि त्यांना मातीमोल करतात 


तुम्हे जो गया छोड
वो इन्सान नही एक गधा है
आफताब कि रोशनी छोड 
जुगनू कि खोजमे खोया है  

Saturday, 4 February 2012

स्वप्न

माझी स्वप्न पाहू नकोस असं म्हणतेस 
तर मग सारखी स्वप्नात का येतेस?
झोपणं न झोपणं हे माझ्या हातात आहे
पण जर आपली भेट फक्त स्वप्नातच होणार आहे 
तर मी कायमचा झोपून जायलाही तयार आहे.......

Friday, 3 February 2012

मरण

नाही होत सहन आता
रोज रोजच मरणं
आणि जगण्यासाठी
या जगात इतरांना मारणं
म्हणून वाटतं कधीकधी
रात्रीच्या गूढ अंधारात
काहीहि कळायच्या आत
मरण जवळ हळूच यावं
अलगद येऊन मला
कुशीत त्याने घ्यावं

Sunday, 29 January 2012

Stuck in the rhyme!!!


Few days back
I was all outta track
and it was ma life
and I was cuttin it 
with a sharp knife
Into freakin tiny pieces
just like the pieces in the puzzle
It was soundin' so damn so crappy
if we remix any Gazal
Now this seems to be changing 
now but still lil bit of confusion 
but now I made things crystal clear
and I let you make decisions
Now I'ma wait for you to make it
and you take your sweet time
'Till the time you do that thing
I am gonna be stuck in this rhyme
This rhyme is you
and I am in it as if
I am stuck with a glue, my boo
I feel so great
when I am stuck in this prison
Ain't no confusion 
now 'cause 
I don't have no reason 
to come outta this leash
cause I'ma be real
its really a fun
so baby, read it please
words are bullets 
while my mouth is a gun
Once the word is out 
it cant come back
And if it goes wrong 
it will make me sad in stacks 

But once upon a time I was new!



I am a Skirt
When I was new
she used to like me.
she used to wash me 
dry me pamper me 
then iron me.
She used to say
I am her favorite one.
She loved me a lot.
She used to always flaunt me
and would blush
if her legs would get compliments 
when she used to wear me.
Now that she has worn 
the same me many times.
Now she feels bored of me.
I was her favorite outfit always.. 
today I am unwanted..
She says "You are resposible for that 
you were honest and true
modest but 'chu'
Lie in a closet
I dont need you."
But once upon a time
I was new!

Hustle


Clock keeps tickin
it's not thinkin he is so tired
Blocked he is feeling caught up
it is so weired
Oh shyt, it's a wake up call it's no dream
But he aint even afraid at all of grim ripper
He drowns deeper n deeper
But he doesn't swim
Though he is a good swimmer
He ain't the one who plans to die
but he is dying
He faints on the ground still lies
that he aint falling
Nobody comes to help him out get up coz
Tragedy is that he pretends
that he's flying high
People wanna point finger at him
either ways
Anyways thats the way we do
he aint got no clue
They wanna stick to him like a glue
when they need him
Thats true!
Wanna screw him through
each possible way
But just show that they pray
for his good
Wanna pretend lil bit
of brotherhood
He been buyin his own food
even though he is rappin now
He has got hell lotta foes
who are tryna trap him now
But the thing is that he aint afraid
Coz he doesn't live on their bread!

Why??


Why does this happen with me always?
I try to do good things but I always
land up choosing wrong ways!
I duunno now how to make
people understand I confess my mistakes
may be big but I aint bad 
life treats me in wack ways
sure this experiene you never had
Sometimes I feel sucidal 
 coz tidal waves of blood flowing thru my heart
Feel like this is my time to depart
if not heaven then may be to hell in dark
Coz I aint as strong as Nepolean Bonapart
Who wanted to win da world
I just wanted to win a tiny place in someones' heart
Makes me paranoid what happens wid me, so goodbye
let me go to the place where my soul may relax!

...Akshay Dandekar

ब्रेनवॉश


हवाय  मला ब्रेनवॉश
विचारांची अडगळ माझ्या  डोक्यात
शंकांचं काहूर माझ्या मनात
लक्ष नाही माझ कशात
हे पाहून चिंता  माझ्या घरात

हवाय  मला ब्रेनवॉश
जस लागत घराला पेस्ट कंट्रोलं
मारून टाकायला एकूण एक झुरळ
जे तडफडत जेवताना पानात
आणि छळत झोपताना अंथरुणात

हवाय  मला ब्रेनवॉश
जसा पीसी ला लागतो मेंटेनन्स
पिरीऑडिक व्हायरस क्लीनअप
जो करतो पीसी ला फास्ट
घालवतो डोक्याचा ताप

हवाय  मला ब्रेनवॉश
डोकं रिफ्रेश करून
इतरांसाठी  लिहायचंय
खूप काही करायचंय
त्यांचाही ब्रेनवॉश करायचाय

आभास

मी कधीकधी खूप मूर्खपणा करतो 
अगदी त्या Archimedes सारख
काही सापडलं म्हणून युरेका 
युरेका असं ओरडत सुटतो 
त्याच्यात आणि माझ्यात फरक दोनच 
मी कपडे अंगावर ठेवून ओरडतो 
आणि तो नग्नावस्थेत 
त्याला खरच शोध लागलेला होता 
मला मात्र आभास झालेला असतो 
खूपदा मला वाटतं
कि मी सुद्धा चंद्राला हातात घ्यावं
त्याच्यावर चांदोमामा म्हणून नाही
तर चंदाराणी म्हणून प्रेम करावं
पण मी Neil Armstrong
सारखा strong नाही
त्याच्यामागे नासाचा backup होता
मी बिचारा सामान्य माणूस
आपल्याकडे साक्षात प्रभू रामचंद्राला सुद्धा
चंद्र आरशात पाहून
compromise करायला लागलं होतं
तर मी कोण? फक्त इतकच
कि अशावेळी मी माझं तोंड बंद ठेवतो
तोंड बंद असला कि माझं डोकं चालतं
डोकं चाललं कि अपोआप विचार
शब्दरूपात कागदावर उमटतात
त्यांना लोक कविता म्हणतात
आणि माझी स्तुती करतात
तेव्हा मला आनंद मात्र
Archimedes आणि Armstrong
पेक्षा जरा जास्तच होतो

Saturday, 28 January 2012

आपण सगळे डास


आपण सगळे डास
आहोत स्वतःपुरते खास
परजीवी आणि रक्तपिपासू
एकमेकांचे रक्त पिऊ
हसत-रडत मौज करू
चावायला मज खूपच आवडे
पण दुसरा चावेल त्याचे वावडे
दुसरा चावला करीन भुणभुण
चालू ठेवीन आपली गुणगुण
स्वत:मध्ये जाईन गुंगून
बनेन आत्मकेंद्री मी
स्वानंदात राहीन मी
इच्छा माझी छोटीशी
अन मूर्तीदेखील छोटीशी

मन करा रे Plastic!

काहींचं मन 
दगडासारखं असतं 
भक्कम, कठोर 
आणि उपद्रवी 
त्यांत भावनाच नसतात 
काहींच मन असतं 
मृदु मेणासारखं 
अगदी पटकन पाघळणारं 
काहींच मन असतं काचेसारखं 
स्वच्छ, पारदर्शक पण नाजुक 
चटकन तडा जाईलस 
तर कधीकधी लख्ख आरशासारखं 
मला वाटतं 
मन plastic चं असावं 
भक्कम, लाँग लाईफ 
पण निरुपद्रवी 
पटकन न पाघळणारं 
कधी अपारदर्शक 
तर कधी अर्धपारदर्शक 
आजकालच्या 'Use and Throw' 
आणि 'Recycle and Reuse' 
या संस्कृतीत मन करा रे Plastic!

४ ओळी


जेव्हा मी तुझ्याशी भांडलो 
तेव्हा शब्द सुद्धा माझ्याशी भांडले
सगळ्या छ्न्दानी पाठ फिरवली
दिसत असेल तुला माझ्या कवितेत
अगदी यमक सुद्धा  मला सोडून गेलं
कविता कविता नाही उरली
काव्यातली गेयता संपून गेली  
शब्दांच्या हातापाया पडलो 
तेव्हा कुठे ह्या ४ ओळी  लिहू शकलो 

तुझ्यासाठी थांबावं वाटे

आयुष्याच्या वाटेवरी 
प्रत्येक वळणावरी 
अनुभवतो श्रावणसरी 
मनास कोरडे वाटे तरी 
म्हणुनच का कोण जाणे 
तु नको म्हण कितीही 
तुझ्यासाठी थांबावं वाटे 

जाता प्रत्येक मैफिली 
रसिक माझ्यापरी जरी 
मैफिल वाटे रिकामी 
तुजविण एकटा मी 
म्हणुनच का कोण जाणे 
तु नको म्हण कितीही 
तुझ्यासाठी थांबावं वाटे

प्रेम आणि पैसा


प्रेम आणि पैसा 
ह्यात बरंच साम्य असतं
दोन्ही बर् याच मार्गांनी
बर् याच व्यक्तींकडुन मिळु शकतं
नाही मिळाले तर खाज येई
आणि मिळाले तर माज येई
म्हणुन मिळेल तेव्हा मिळवा
आणि मिळवल्यावर टिकवा
मिळायला हवे तर तुम्ही हवे
एकतर लकी किंवा मेहनती
गमवायला फक्त पुरते
तुमच्या अंगातली मस्ती!

काककथा

घराच्या आवारात 
वाटलं भरल्ये 
कावळ्यांची सभा 
कावकाव कावकाव 
गोंगाटाने आवाजाने 
सकाळी झालो जागा 
झोपमोड झाली 
म्हणुन जरा चिडलो 
"काय कटकट आहे?" 
गँलरीत जाऊन ओरडलो 
पहातो तर काय! 
एक कावळा पडलेला मरुन 
आई म्हणाली, "काचा घे लावुन" 
म्हणालो "म्युन्सिपाल्टीत फोन करु 
नेतील ते कावळा उचलून" 
आई म्हणाली "नको, 
कावळे घेतील पाहुन" 
"पण का?" आईचा राग आला 
मी आईला म्हणालो 
"आपल्यातला कोण मेला 
कि कावळा पिंडाला शिवावा 
म्हणुन केवढे खटाटोप करता 
आणि हे बोलणं... जर तो मेला?" 
आई म्हणे "त्यांची जातच तशी 
राजकारणी लोकं जशी 
पिंड खायला मिळतं म्हणुन 
कोणी मेला कि जमतात 
त्यांच गुडविल तयार करतात 
आणि त्यांच्यात कोणी मेला 
की ईतर कावळे 
कोणालाच जवळपास 
फिरकु देत नाहीत 
फिरकला चांगुलपणाने तर 
त्याला चोचींनी टोचुन मारतात 
मढ्याच्या टाळुवरच लोणि खाणं 
बहुतेक ह्यालाच म्हणतात 
मढं कोणाचही असो!"

तु, मी आणि २ कटिंग!

जेव्हा माझ्या हातात पेन असतं 
पण मनातलं कागदावर उमटत नसतं 
त्यावेळी टपरीकडे धाव घेतो मी 
आणि भैय्याकडे कटींग मागतो मी 
आठवतं तुला? 
कट्ट्यावर भंकस करताना 
प्रत्येकजण फुंकत असताना 
माझ्या हातात फक्त कटिंग असे 
फुंकलास तर कलटी देईन तुला 
सक्त ताकिद होती मला 
हे मी विसरीन कसे? 
आठवतात का 
आपल्या 
नुकत्याच प्रेमात पडल्यानंतरच्या भेटी? 
तासंतास बोलत बसायचो चौघं 
आपल्या हातातले २ कटींग 

आणि आपण दोघं 
टपरीशिवाय पर्यायच नव्हता 
आपला चहा रिचवायचा स्पीड पाहता 
CCD वाला जाम श्रीमंत झाला असता 
कधीमधी कटिंगबरोबर हातात 
भजीपाव असायचा.. क्या बात! 
आज कितीतरी वर्ष लोटली 
तु किचनचा चार्ज घेतलास 
आणि चहाची चिंता मिटली 
पण आजही मनापासुन वाटतं 
पुन्हा चौघं मिळुन बसावं 
मनसोक्त गप्पा माराव्या 
तु, मी आणि २ कटिंग!

Thursday, 19 January 2012

रोज रोज दररोज


मला मनाने आणखी जवळ यायचंय 
काल जितके होतो जवळ त्याहिपेक्षा जास्त 
हि इच्छा आहे मी बाळगून मनात 
रोज रोज दररोज 

मी न मागता मी न सांगता 
तू माझ्यासाठी खूप काही केलस
विसरायला मला भाग पाडलस 
माझा असह्य भूतकाळ

लवकरच तू मला त्याच ठिकाणी भेटशील
जिथून ह्या सगळ्याची सुरुवात झाली
दुख आणि चिंता ह्यांचा लवलेशहि नसेल 
हि इच्छा आहे मी बाळगून मनात 
रोज रोज दररोज 

Wednesday, 18 January 2012

खेळ

क्रिकेटर्स क्रिकेटचा खेळ खेळतात
जुगारी पत्ते आणि पैशांशी खेळतात
सैनिक स्वत:च्या जिवाशी खेळतात
नीच लोकं इतरांच्या आयुष्यांशी खेळतात
दुष्ट दुसर् याच्या भावनांशी खेळतात
मी कवी.... फक्त शब्दांशी खेळतो

देवाला पत्र


मला काही दिवसांपूर्वी  
तुझ्या अस्तित्वाचा आभास झाला होता 
पण तो आभासच होता 
हे आता काहीसं उमजू लागलंय
सत्य नेहमीच कटू असत  
हे आता समजू लागलंय 
कटू सत्य हेच आहे कि 
सच्च्या मनाने काही करावे 
तर ते लोकांना खोटे वाटते 
आणि खोटे मोठ्याने ओरडून सांगावे 
तर ते काही वेळाने खरे बनते 
सत्य हेच कि घोर कलियुग आहे
कलियुगात माझा प्रभाव अत्यंत कमी असेल 
असं तू स्वतः म्हणाला होतास
मग  खोट्या आशा देऊन काय सिद्ध करतोयस?
कि जे तू सत्ययुगात म्हणालास ते खरं आहे?
कि तू खोट्या कलियुगात 
स्वतःहि खोटारडा बनला आहेस? 

कलावंत


कलेवर आधारित अश्या बऱ्याच गोष्टी 
होतात माझ्या हातून साकार 
स्वत्वाला शोधता शोधता 
त्या घेती माझ्या मनाचा आकार
मी  रात्रंदिवस  चिकार गोष्टींचा करतो विचार
मला वाटतं हे आहे मला देवाचं देणं
जे विकत मिळत नाही द्या चांदी  किंवा सोनं
 मी ते वापरून माझी स्वप्नं आणि विचार मांडतो 
आणि पैशांच्या प्रलोभनापासून मी दूर राहावं
म्हणून या संपूर्ण  जगाशी भांडतो 
जेव्हा मी दुसऱ्यासाठी  काम करतो 
तेव्हा दिवस अक्षरश: वाया  जातो 
आणि मी तरीही जगण्यासाठी धडपडतो 
तो श्रीमंत होत जातो आणि मी  जसाच्या तसा  
वय माझ  ५८  होताच तो म्हणतो घरी बसा 
मी त्याला विकतो माझ  उमेदीच वय 
माझ  तारुण्य आणि आयुष्यसुद्धा
हा असा विचार करणारा मी एकटाच असेन 
मी.. या दुष्ट  जगाने मारून टाकलेला 
आणि पुन्हा जिवंत झालेला कलावंत