हवाय मला ब्रेनवॉश
विचारांची अडगळ माझ्या डोक्यात
शंकांचं काहूर माझ्या मनात
लक्ष नाही माझ कशात
हे पाहून चिंता माझ्या घरात
हवाय मला ब्रेनवॉश
जस लागत घराला पेस्ट कंट्रोलं
मारून टाकायला एकूण एक झुरळ
जे तडफडत जेवताना पानात
आणि छळत झोपताना अंथरुणात
हवाय मला ब्रेनवॉश
जसा पीसी ला लागतो मेंटेनन्स
पिरीऑडिक व्हायरस क्लीनअप
जो करतो पीसी ला फास्ट
घालवतो डोक्याचा ताप
हवाय मला ब्रेनवॉश
डोकं रिफ्रेश करून
इतरांसाठी लिहायचंय
खूप काही करायचंय
त्यांचाही ब्रेनवॉश करायचाय
No comments:
Post a Comment