Monday, 16 January 2012

तु संगीत माझे

मी गाता होशी संगीत माझे
काव्य माझे अन भाव तुझे
संवादिनी संवाद साधे
जणु वाद्य नसे तव ध्वनी असे
गीतातील ताल जणु तव पदरव
सुषिर जणु श्वास तुझा
कंप तंतुतील आनंदलहरी
पडता तव कानी ते गीत बने 
तोवर केवळ प्रीत असे

No comments:

Post a Comment