जत्रा भरल्ये.. आलात? या.
पहा, निरनिराळे खेळ आहेत
मृत्युगोलात जीवन मरणाचा प्रश्न आहे
बघे त्यालाहि खेळच म्हणतात
कारण ते त्यासाठी तिकिट काढतात
हे उंच जायंट व्हील तुम्हाला उंचीवर नेईल
आणि खाली घेऊन येईल हे निश्चित
मिनीट्रेनमध्ये बसा...प्रवासाचा फील येईल..
पण सुरु कराल त्याच ठिकाणी प्रवास संपेल.
जादुचे प्रयोगदेखील आहेत..
ती हातचलाखी असते असं बरेचजण म्हणतात
तरीही ते पहायला पैसे मोजतात.
रिंगा फेकण्याच्या जुगाराच्या खेळात
टिव्ही-रेडिओ टारगेट करतात
तेव्हा किमान साबणाची वडी जिंकतातच.
लहान किंवा मोठे जत्रा सगळ्यांनाच आवडते
न आवडुन दुसरा ऑप्शन आहे कुठे?
पहा, निरनिराळे खेळ आहेत
मृत्युगोलात जीवन मरणाचा प्रश्न आहे
बघे त्यालाहि खेळच म्हणतात
कारण ते त्यासाठी तिकिट काढतात
हे उंच जायंट व्हील तुम्हाला उंचीवर नेईल
आणि खाली घेऊन येईल हे निश्चित
मिनीट्रेनमध्ये बसा...प्रवासाचा फील येईल..
पण सुरु कराल त्याच ठिकाणी प्रवास संपेल.
जादुचे प्रयोगदेखील आहेत..
ती हातचलाखी असते असं बरेचजण म्हणतात
तरीही ते पहायला पैसे मोजतात.
रिंगा फेकण्याच्या जुगाराच्या खेळात
टिव्ही-रेडिओ टारगेट करतात
तेव्हा किमान साबणाची वडी जिंकतातच.
लहान किंवा मोठे जत्रा सगळ्यांनाच आवडते
न आवडुन दुसरा ऑप्शन आहे कुठे?
No comments:
Post a Comment