Tuesday, 17 January 2012

मी तुझी वाट पाहतोय!!


हे मना, मला माहित्ये  
तू एक फुलपाखरू आहेस 
सुंदर दिसणारं, रंगीबेरंगी, नाजूक 
सुरुवातीच्या सुरवंटाच्या रुपात
एकाच जागी पडून राहून 
तुला खूप कंटाळा आला असेल ना?
आणि आता नुकतेच पंख फुटलेत 
त्यामुळे उंच उडण्याची 
आसक्ती असेल तुला
मी समजू शकतो 
तुला जग पहायचं आहे 
उंचावरून, जवळून. पहा 
फक्त सांभाळून राहा 
वारा उनाड असतो
कधी तुझे नाजूक पंख 
तो चुरगळून टाकेल 
ते तुला कळणार सुद्धा नाही 
वेगवेगळ्या बगीच्यांमध्ये जा 
निरनिराळ्या फुलांवर बस  
सुगंध घे, मकरंद पी  
त्यातलं एकही फुल 
तुझ्याबरोबर येणार नाही
हे मात्र पक्क लक्षात ठेव 
त्यासाठी वेडे प्रयत्न
अजिबात करू नकोस
नाहीतर तुझीच दमछाक होईल
सुंदर पंख गळून पडतील
म्हणून काळजी घे 
आणि एकदा का 
सगळं जग नीट पाहिलंस 
कि तुला लक्षात येईल  
आपलाच बगीचा बरा  
तेव्हा परत ये!!
मी तुझं आयुष्य  
तुझी वाट पाहतोय!!

No comments:

Post a Comment