Monday, 16 January 2012

सापशिडी


सापशिडीचा खेळ खेळतोय मी
सुरवात पहिल्या घरापासुनच करायच्ये
नशिबाचे फासेच ठरवतील
माझी वर जायची लायकी आहे की नाही
काही वेळा चढायला मिळेल शिडी
काही वेळा दुष्ट साप खाली आपटवेल
सहा आकडा आला तर
पुन्हा पुढे जायची संधी मिळेल
शिडी चढल्यावर माजणार नाही
सापाच्या बापालाही भिणार नाही
काम माझं फासे टाकुन पहाणं
कारण फासे टाकलेच नाही तर
जागच्या जागीच पुढे न मागे
न साप का न सिढीका!

No comments:

Post a Comment