मी असताना संगे तुझिया
मजसंगे तु असशी का?
मी नसताना जवळी तुझिया
सांग मला तु स्मरशी का?
राहिल स्मृतीत सतत माझिया
साक्षीस होता तेव्हा दरिया
पहिलीवहिली भेट आपुली
हर्ष सांज ती देऊन गेली
नयनात तुझ्या मी हरवुन गेलो
मज ना उरली गरजच कसली
हात तुझा मी हाती घेता
मम अस्तित्वाची मज ओळख पटली
मनी इच्छा एकच उरली
मिळो साथ तुझी नियमीत मजला
अन आयुष्याच्या सायंकाली
No comments:
Post a Comment