जेव्हा मी तुझ्याशी भांडलो
तेव्हा शब्द सुद्धा माझ्याशी भांडले
सगळ्या छ्न्दानी पाठ फिरवली
दिसत असेल तुला माझ्या कवितेत
अगदी यमक सुद्धा मला सोडून गेलं
कविता कविता नाही उरली
काव्यातली गेयता संपून गेली
शब्दांच्या हातापाया पडलो
तेव्हा कुठे ह्या ४ ओळी लिहू शकलो
No comments:
Post a Comment