मला मनाने आणखी जवळ यायचंय
काल जितके होतो जवळ त्याहिपेक्षा जास्त
हि इच्छा आहे मी बाळगून मनात
रोज रोज दररोज
मी न मागता मी न सांगता
तू माझ्यासाठी खूप काही केलस
विसरायला मला भाग पाडलस
माझा असह्य भूतकाळ
लवकरच तू मला त्याच ठिकाणी भेटशील
जिथून ह्या सगळ्याची सुरुवात झाली
दुख आणि चिंता ह्यांचा लवलेशहि नसेल
हि इच्छा आहे मी बाळगून मनात
रोज रोज दररोज
No comments:
Post a Comment