Sunday, 29 January 2012

आभास

मी कधीकधी खूप मूर्खपणा करतो 
अगदी त्या Archimedes सारख
काही सापडलं म्हणून युरेका 
युरेका असं ओरडत सुटतो 
त्याच्यात आणि माझ्यात फरक दोनच 
मी कपडे अंगावर ठेवून ओरडतो 
आणि तो नग्नावस्थेत 
त्याला खरच शोध लागलेला होता 
मला मात्र आभास झालेला असतो 
खूपदा मला वाटतं
कि मी सुद्धा चंद्राला हातात घ्यावं
त्याच्यावर चांदोमामा म्हणून नाही
तर चंदाराणी म्हणून प्रेम करावं
पण मी Neil Armstrong
सारखा strong नाही
त्याच्यामागे नासाचा backup होता
मी बिचारा सामान्य माणूस
आपल्याकडे साक्षात प्रभू रामचंद्राला सुद्धा
चंद्र आरशात पाहून
compromise करायला लागलं होतं
तर मी कोण? फक्त इतकच
कि अशावेळी मी माझं तोंड बंद ठेवतो
तोंड बंद असला कि माझं डोकं चालतं
डोकं चाललं कि अपोआप विचार
शब्दरूपात कागदावर उमटतात
त्यांना लोक कविता म्हणतात
आणि माझी स्तुती करतात
तेव्हा मला आनंद मात्र
Archimedes आणि Armstrong
पेक्षा जरा जास्तच होतो

No comments:

Post a Comment