Monday, 16 January 2012

मी कळी बोलत्ये

मी एक कळी आहे  
अजूनही न खुललेली अजून लहानशी, इवलीशी
खुलून येण्यासाठी मला ओलावा, उन, पोषण हवं
प्रसंगी सोसाट्याच्या वाऱ्यात 
मी गळून पडू नये म्हणून संरक्षण सुद्धा
हे सगळं झाडाने करायचं असत
झाड करतदेखील  पण जर  मी फुल होऊन 
देवाच्या पायाशी जागा मिळवू नाही शकले
तर झाड मला सोडून देतं, मी गळून पडते 
नासून जाते, मातीमोल होत माझं अंग
पण मला फुलण्याआधी गळू देऊ नका
मी फुलण्यासाठी झाडावर अवलंबून आहे
ह्याचा अर्थ असा नाही की  मी फुलले की 
झाडावरचं माझं प्रेम कमी होईल
पण काही झाडांना अस वाटत 
मला फुलू द्या , खुलू द्या, एकदा खुलले
की मी सुगंधी बनून सगळ्यांना आनंद  देईन  

No comments:

Post a Comment