कलेवर आधारित अश्या बऱ्याच गोष्टी
होतात माझ्या हातून साकार
स्वत्वाला शोधता शोधता
त्या घेती माझ्या मनाचा आकार
मी रात्रंदिवस चिकार गोष्टींचा करतो विचार
मला वाटतं हे आहे मला देवाचं देणं
जे विकत मिळत नाही द्या चांदी किंवा सोनं
मी ते वापरून माझी स्वप्नं आणि विचार मांडतो
आणि पैशांच्या प्रलोभनापासून मी दूर राहावं
म्हणून या संपूर्ण जगाशी भांडतो
जेव्हा मी दुसऱ्यासाठी काम करतो
तेव्हा दिवस अक्षरश: वाया जातो
आणि मी तरीही जगण्यासाठी धडपडतो
तो श्रीमंत होत जातो आणि मी जसाच्या तसा
वय माझ ५८ होताच तो म्हणतो घरी बसा
मी त्याला विकतो माझ उमेदीच वय
माझ तारुण्य आणि आयुष्यसुद्धा
हा असा विचार करणारा मी एकटाच असेन
मी.. या दुष्ट जगाने मारून टाकलेला
आणि पुन्हा जिवंत झालेला कलावंत
No comments:
Post a Comment