Monday, 16 January 2012

पोवाडा


देश होता अमुचा एक स्वर्ग 
शेती  सुबत्ता आणि निसर्ग
अभेद्य किल्ले आणि आमचे दुर्ग 
करून टाकले त्याला बुजुर्ग
होsss इथं कुंपण शेत खाई
हो जीजीजी

(Nurration)
शिव रायांच्या राज्यात 
महाराष्ट्र देश मोठा होता
इथं सुबत्ता नांदत असे 
आता त्यांचे वंशज म्हणवून घेणारे 
महाराष्ट्राला विकून खायला पाहताहेत
वरवर सगळं चित्र सुंदर वाटत 
पण तसा नाहीये

महाराष्ट्र देश हा महान
आम्ही टाकला आहे तो गहाण
दिल्लीत गोरी राणी विराजमान
बनू तिच्या पायाची वहाण
होsss इथं  कुंपण शेत खाई
हो जीजीजी

सुरक्षित असे अमुचा देश
इथं चोरडाकू भी मजेत  
खर्चाचा काही ना हिसाब
असे पाहुणा आमचा कसाब 
होsss इथं कुंपण शेत खाई
हो जीजीजी

खादाडांची जमली इथं गर्दी
त्यांच्या अंगात बारा मण चरबी
सच्चाईची सद्दी आता फिरली
सरळमार्गी लोकं सारी हरली
होsss इथं कुंपण शेत खाई
हो जीजीजी

झालं लोकपाल आंदोलन मोठं
मोठेमोठे चारी मुंड्या चितं
सगळे चोर झाले भयभीतं
सगळे फिरती तरी बिनधास्त
होsss इथं कुंपण शेत खाई
हो जीजीजी

विकुन खाल्ली आम्ही इमानदारी
टेबलाखाली आम्ही व्यवहारी
धर्म आमुचा असे लाचखोरी
देव पैसा कचेरी पंढरी
होsss इथं कुंपण शेत खाई
हो जीजीजी

¤ अक्षय दांडेकर ¤

No comments:

Post a Comment