Saturday, 28 January 2012

तु, मी आणि २ कटिंग!

जेव्हा माझ्या हातात पेन असतं 
पण मनातलं कागदावर उमटत नसतं 
त्यावेळी टपरीकडे धाव घेतो मी 
आणि भैय्याकडे कटींग मागतो मी 
आठवतं तुला? 
कट्ट्यावर भंकस करताना 
प्रत्येकजण फुंकत असताना 
माझ्या हातात फक्त कटिंग असे 
फुंकलास तर कलटी देईन तुला 
सक्त ताकिद होती मला 
हे मी विसरीन कसे? 
आठवतात का 
आपल्या 
नुकत्याच प्रेमात पडल्यानंतरच्या भेटी? 
तासंतास बोलत बसायचो चौघं 
आपल्या हातातले २ कटींग 

आणि आपण दोघं 
टपरीशिवाय पर्यायच नव्हता 
आपला चहा रिचवायचा स्पीड पाहता 
CCD वाला जाम श्रीमंत झाला असता 
कधीमधी कटिंगबरोबर हातात 
भजीपाव असायचा.. क्या बात! 
आज कितीतरी वर्ष लोटली 
तु किचनचा चार्ज घेतलास 
आणि चहाची चिंता मिटली 
पण आजही मनापासुन वाटतं 
पुन्हा चौघं मिळुन बसावं 
मनसोक्त गप्पा माराव्या 
तु, मी आणि २ कटिंग!

No comments:

Post a Comment