Monday, 16 January 2012

वाटेवरती डोळे माझे


तिच्या वहीवाटे वरचे काटे
मी अलगदपणे उचलत गेलो
मार्ग तिचा सुखकर झाला
रक्त फक्त सांडले मी माझे
ती गेली आणि जाता जाता
धन्यवाद मज म्हणून गेली
धन्य वाटले मनास माझ्या
जेव्हा स्मित ती करून गेली
जाता जाता म्हणून गेली
इथेच थांबा परत मी येईन
थांबले आयुष्य माझे
वाटेवरती डोळे माझे

No comments:

Post a Comment