Monday, 16 January 2012

तुला पाहिलं कि


तुला पाहिलं कि  
मी शब्द विसरून जातो
गंध तुझा आसमंत भरून टाकतो
आवाज तुझा गोड 
चारी दिशांत घुमतो
जेव्हा नजर खिळते तुझ्यावर 
माझ्यातला कवी 
भक्त बनू पाहतो
भक्त मंत्रमुग्ध होतो 
मंत्रोच्चारात नाव हि तुझच असत 
इतर शब्द नसतात 
आणि असले जरी एखाददोन 
तर समानार्थी असतात 
अर्थ ज्यांचा एकच असतो
माझं तुझ्यावरच  प्रेम
दुसरा काही नाही  


No comments:

Post a Comment