Monday, 16 January 2012

कधी कळेल तुला सांग?


कधी कळेल तुला सांग?
जगात कोणतीही गोष्ट एका पारड्यात ठेवून तोलली
तर त्यांच्यातील वजनाचा फरक कळून येत नाही
मी आणि तो अगदीच वेगवेगळ्या वजनाचे आहोत
एखादा शेंबडा सुद्धा नुसता पाहून सांगेल
कधी कळेल तुला सांग?
पाचही बोटं हातावर असली तरीही ती सारखी नसतात 
नुसतीच लांबी नाही तर बह्यारुपही वेगळा असतं
आम्ही दोघं  वेगवेगळ्या व्यक्ती आहोत
त्याचे हात वेगळे आणि माझे हात वेगळे
कधी कळेल तुला सांग?
गरम दूध पिताना तोंड भाजलं
म्हणून ताक देखील फुंकून पित्येस 
मी दूध नाही मी ताकही नाही 
मी तोंड भाजून टाकीन इतका दुष्ट देखील नाही
कधी कळेल तुला सांग?

No comments:

Post a Comment